
गोंदिया, दि.31 मार्च: इन्फो ओरिजिन फाउंडेशनच्या वतीने ढाकनी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामवाशीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबिरासाठी त्रिशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गोंदिया यांचे वैद्यकीय सहकार्य लाभले.शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. सामान्य चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी करण्यात आली. तसेच रक्त तपासणी, ईसीजी यांसारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधा देखील देण्यात आल्या.संपूर्ण शिबिराचे नियोजन इन्फो ओरिजिन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या मदतीने व्यवस्थित रित्या पार पडले. लाभार्थींना आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले तसेच तपासणीचा लाभ घेता आला.या उपक्रमामुळे गोंदिया जिल्ह्यातील या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मदत झाली. इन्फो ओरिजिन फाउंडेशनतर्फे पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.





