25.4 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा

जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा

0
44

पंचायत समितीकडून ठराव मंजूर : यूजीसी कायदा तत्काळ लागू करा

सडक अर्जुनी,दि.३१: केंद्र सरकारने यूजीसी कायदा लागू करावा यासंदर्भात सडक अर्जुनी पंचायत समिती सभागृहात चर्चा घडवून आणण्यात आली. कायद्यामुळे मागास प्रवर्गातील विद्यार्थी व परीक्षार्थी यांना निश्चितच फायदा होणार असून, या कायद्याची या अंमलबजावणी तत्काळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात यावी, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सडक अर्जुनी पंचायत समितीची मासिक सभा २४ मार्चला आयोजित करण्यात आली होती. त्यात विषयपत्रिकेतील विषयानंतर अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्या यूजीसी कायदा संपूर्ण महाराष्ट्रभर तत्काळ लागू करण्यात यावा, असे पंचायत समिती सदस्या वर्षा शहारे यांनी सुचविले. त्याला डॉ. रुकीराम वाडई यांनी अनुमोदन दिले व ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला. केंद्र शासनाने जनगणना २०२७ चे राजपत्र प्रसिद्ध केले असून, या प्रसिद्धी पत्रामध्ये ओबीसी प्रवर्गाचा रकाना समाविष्ट करण्यात आला नाही, यावरही सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी जनगणना करताना ओबीसी वर्गाचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा व त्यानंतरच जनगणनेची प्रक्रिया राबविण्यात यावी. जर ओबीसी वर्गाचा स्वतंत्र रकाना ठेवण्यात आला नाही तर सडक अर्जुनी तालुक्याचा या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

blank