23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home Top News मोहोळ तहसीलदारांना ACB ची चौकशी नोटीस

मोहोळ तहसीलदारांना ACB ची चौकशी नोटीस

0
141

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडवणाऱ्या लाच प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने (ACB) तपासाची व्याप्ती वाढवली असून, मोहोळच्या तहसीलदारांना १ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वाफळे येथील तलाठीने वरिष्ठांचे नाव सांगून ट्रॅक्टर मालकाकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मुरूम वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी संबंधित तलाठीने ठराविक रकमेची मागणी केली होती. या प्रकरणात वाफळेचे तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून रंगेहात पकडले. सुरुवातीला ३३ हजार रुपयांच्या व्यवहारात २३ हजार रुपये स्वीकारल्याची कबुली देण्यात आली होती, तर उर्वरित १० हजार रुपये स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगून मागितले गेले होते. सापळा कारवाईदरम्यान ही उर्वरित रक्कम स्वीकारताना जाधव यांना पकडण्यात आले.
या प्रकरणी माढा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत कलम ७ व ७अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी तलाठीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान “वरिष्ठांचे नाव” पुढे करून लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने तपासाचा फोकस आता उच्चस्तरीय जबाबदारीवर केंद्रित झाला आहे.

blank