35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ तिसऱ्यांदा वाघाचे महिलेवर आक्रमणाचे सत्र सुरूच

तिसऱ्यांदा वाघाचे महिलेवर आक्रमणाचे सत्र सुरूच

0
23

साकोली : आमगांव बुजृक येथील ०१ एप्रिल स. ९ च्या घटनेत पुन्हा तिसऱ्यांदा छाया सुधाकर मुंगमोडे ५३ या शेतशिवारात काड्या जमा करतांनाच अचानक वाघाने हल्ला करून महिलेस गंभीररीत्या जखमी केले.जखमीला उपजिल्हा रुग्णालय साकोलीत आणले. नंतर नागपुरला हलविण्यात आले होते. वारंवार महिला पुरुष जनतेवर आक्रमण करणा-या त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करून दुरवरील वन्यजीव संरक्षण क्षेत्रात सोडण्यात यावे अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले जि. प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर, माजी जि. प. स. डॉ. नेपाल रंगारी, नगराध्यक्ष देवश्री कापगते, माहेश्वरी नेवारे, पिंडकेपार सरपंच नंदू समरीत, माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते, खासदार डॉ. पडोळेंचे स्वीय सहाय्यक मेदन लांडगे यांसह साकोली सेंदूरवाफा शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पदाधिकारींनी ही रास्त मागणी केली आहे. रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर गायधने यांनी महिलेवर तात्काळ प्राथमिक उपचार सुरू केले होते. येथे संतप्त जनतेची गर्दी पाहता पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर हे पोलीस चमूंसह रूग्णालयात दाखल होत परीस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

blank