
नागपूर,दि.०२- महाराष्ट्र शासनाच्या विविध तहसील कार्यालयाद्वारे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना लोकसंख्या मोजणी संदर्भात जबाबदारी देण्यात आली.सदर जबाबदारी देत असताना प्राध्यापकाचा पदाचा सन्मानाचा विचार न करता आणि परीक्षेतील संवेदनशील वेळेचा विचार न करता जबाबदारी देण्यात आल्याने प्राध्यापकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन (DBATO) नागपूरच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त नागपूर यांना निवेदन सादर करुन निषेध नोंदवला.
प्राध्यापक शैक्षणिक परीक्षेचे काम सोडून अशा लोकसंख्या मोजणीच्या कामावर रूजू होणार नाही आणि अशा जबाबदाऱ्या पार पाडणार नाही असे सांगितले. निवेदनात विविध बाबींचा उल्लेख करून त्याविषयी विभागीय आयुक्त डॉ. खोडे यांच्याशी चर्चा केली. प्रशासकीय स्तरावर तालुका स्तरावरील तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी प्राध्यापकांना प्रशासकीय आदेश देऊ शकत नाही. अशा स्वरूपातील कामे यापुढेही देण्यात येऊ नये असे निवेदन दिले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष व सिनेट सदस्य, ओमप्रकाश चिमणकर सचिव व सिनेट सदस्य डॉ. श्रीकांत भोवते, प्राचार्य डॉ. अंबादास मोहिते, तसेच पदाधिकारी डॉ. नितीन मेश्राम डॉ. धीरज अंबाडे, डॉ. संजय फुलकर, डॉ. माधुरी राऊत, डॉ. अमरीश ठाकरे, डॉ. विमल राठोड, डॉ. विवेक चव्हाण, डॉ. सुमेध नागदेव डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. अमृता डोंरलीकर, डॉ. कुलभूषण मेघे, डॉ. योगेश मुनेश्वर, डॉ. बाभळे, डॉ. कमलकिशोर गुप्ता, डॉ. सुधीर डांगे आणि १०० च्या वर प्राध्यापकांनी निवेदन देण्यासाठी हजेरी लावली.





