26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ धान विक्रीकरीता ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरु

धान विक्रीकरीता ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरु

0
151

गोंदिया, दि.2 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 मधील धान विक्रीकरीता शासनाचे अधिकृत BEAM पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी 1 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्याकरीता शासनाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता आवश्यक त्या कागदपत्रासह जसे- रब्बी पणन हंगाम 2025-26 चा पीक पेरा नोंद असलेला ऑनलाईन 7/12 उतारा व नमुना 8, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, सामुहिक 7/12 उतारे असल्यास उताऱ्यावरील इतर व्यक्तींचे सहमती पत्र व आधार कार्ड इत्यादी कागदपत्र सोबत घेऊन तालुक्यातील नजीकच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर जाऊन शासनाकडून दिलेल्या कालावधीत म्हणजेच दि.30 एप्रिल 2026 पर्यंत धान विक्रीसाठी नजीकच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी पूर्ण करावी. शासनाच्या धान खरेदी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.एस.इंगळे यांनी केले आहे.