सडक अर्जुनी,दि.१४ः- तालुक्यातील वासुदेवराव लंजे प्राथमिक, दामाजी पाटील लंजे माध्यमिक व अशोक लंजे कला व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी येथे महामानव, विश्वरत्न, भारतरत्न,बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लंजे, सचिव व प्रमुख पाहुणे सौं. संध्याताई लंजे, अध्यक्ष लंजे शिक्षण संस्था सौंदड व मुख्याध्यापक श्री बनसोड, पुसतोडे व प्राचार्य कापकरते शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी महामानवाच्या प्रतिमेला फुल अर्पण करून नमन केले.भीम जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाषण व गायन करून आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी संस्थेचे सचिव व मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन झोडे यांनी केले.





