29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ अभियंता कॉलनीत पाणीच पाणी, 2 ते 3 फूट साचलेले पाणी

अभियंता कॉलनीत पाणीच पाणी, 2 ते 3 फूट साचलेले पाणी

0
3

गोंदिया:गोंदियातील अभियंता कॉलनी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे जलाशयात रूपांतर झाले आहे.बुधवार दिनांक 29/07/2026 रोजी सकाळी घेतलेल्या पाहणीनुसार M.i.e.t Rd, Miet Campus, कुडवा येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. साचलेल्या पाण्यात लहान मुले खेळताना दिसत आहेत, ज्यामुळे अपघात आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.तसेच पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे.

blank