24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ हिदूर जंगलात चकमक, नक्षल साहित्य ताब्यात

हिदूर जंगलात चकमक, नक्षल साहित्य ताब्यात

0
29

गडचिरोली, दि.03: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना  भामरागड तालुक्यातील हिदूर-हितापाडी जंगलात पोलिस व नक्षल्यांशी चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथक व क्यूआरटी पथकाचे जवान आज पहाटे हिदूर परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे १ क्लेमोर माईन, २ वायर बंडल, औषधी, नक्षल चळवळीची पुस्तके व काही लिखित साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य ताब्यात घेतले. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.