८ डिसेंबरला ओबीसींचा मोर्चा: विदर्भ तेली समाज महासंघाचा पाठिंबा

0
17

गोंदिया दि.03:-गोंदिया जिल्हा विदर्भ तेली समाज महासंघाची जिल्हा स्तरावरील बैठक केंद्रीय सरचिटणीस तथा गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नामदेव हटवार यांच्या अध्यक्षतेखाली संताजी सभागृह पिंडकेपार रोड गोंदिया येथे पार पडली. या बैठकीत सर्वानुमते विदर्भ तेली समाज महासंघाने नागपूर येथे ८ डिसेंबरला आयोजित ओबीसी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा घोषित केला व सर्व समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे सर्वानुमते आवाहन करण्यात आले.
९ नोव्हेंबर २00१ ला विदर्भ तेली समाज महासंघाने ओबीसीला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विदर्भात सर्वच तहसील कार्यालयावर धरणे आंदोलने केली होती. ५ नोव्हेंबर २00२ ला आमदार, खासदार चेतावनी आंदोलन राबवून समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाने बैठक घेवून २८ नोव्हेंबर २00२ ला ओबीसींना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली, अशी माहिती डॉ. नामदेव हटवार यांनी दिली. यावेळी इतरही अनेक समाजाच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.
संचालन जिल्हा सचिव संतोष खोब्रागडे यांनी केले. आभार मोरेश्‍वर साठवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस.यू.वंजारी, नारायण बावणकर, लखन धावडे, राजू वंजारी, सागर काटेखाये, पप्पू साठवणे, बानू तुलशीकर, हरिराम बारबुद्धे, शंकर चामट, श्रावण माहुरे यांनी सहकार्य केले.