30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता हुडकेश्वरमधील बिअर बारमध्ये हंगामा तोडफोड आणि मारहाण

हुडकेश्वरमधील बिअर बारमध्ये हंगामा तोडफोड आणि मारहाण

0
78
नागपुर :– नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एस के बिअर बारमध्ये काल रात्री मोठा गोंधळ उडाला. दारू पिण्यासाठी आलेल्या काही तरुणांमध्ये आणि बार कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला.मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने मद्याच्या नशेत बारच्या आत उलटी केली. त्यानंतर बारमधील एका कर्मचाऱ्याने ही घाण कोण साफ करणार असा सवाल उपस्थित केला.यावर संबंधित ग्राहकाने सफाईसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. मात्र, या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढत गेला आणि पाहता पाहता हा वाद मारहाणीत परिवर्तित झाला.
या दरम्यान बारमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या झटापटीत दोन्ही बाजूंतील काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.घटनेनंतर बार कर्मचाऱ्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात दंगल केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.