
अर्जुनी-मोर.,दि.२३ः-तालुक्यातील तिडका गावालगत असलेल्या जंगल परिसरात वनविभागाच्या कम्पार्टमेंट क्रमांक 1153 मध्ये दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना आज घडली. ही आग गावातील घरांच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती.दरम्यान गावचे पोलीस पाटील प्रशांत पुस्तोळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अर्जुनी-मोरगाव नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.
या बचावकार्यात अग्णीशमक दलाचे काळबांधे ,वनरक्षक बडोले, सरपंच बबीता उईके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कुंडलीक कोसरे तसेच इतर ग्रामस्थांनी मोठी मदत केली. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि संभाव्य मोठे नुकसान टळले.





