24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ शहीद जवानांच्या कुटूंबियांना दिवाळी भेट

शहीद जवानांच्या कुटूंबियांना दिवाळी भेट

0
29

देवरी,दि.03-उरी हल्ल्यात शहिद झालेल्या महाराष्ट्रातील चार जवानांच्या कुटूंबियांना दिवाळी निमित्त आर्थिक मदत आणि आणि फराळाचे साहित्यात मिठाई पोहोचवून देण्याकरीता देवरी तालुक्यातील नवयुवक गणेश मंडळाचे १० कार्यकर्ते महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात जाण्याकरीता रवाना झाले आहे. देवरी येथील नवयुवक गणेश मंडळं दरवर्षी गणेश उत्सवा दरम्यान सार्वजनिक उपक्रम राबवितो आणि याच उपक्रमाच्या माध्यमातून मागील पाच वर्षा पासून जिल्ह्यात कधी प्रथम तर कधी द्वितीय पुरस्कार पटकावतो. मिळालेल्या राशीतून सामाजिक बांधिलकी जोपासत गरजू लोकांना आर्थिक मदत हे मंडळ करत. याच निमित्ताने यावर्षी मिळालेल्या ७५ हजारच्या पुरस्कार राशीतून आणि कार्यकर्त्यांच्या गोळा केलेल्या राशीतून दीड लाखाचा निधी आणि मिठाई-फराळ घेऊन हे नवयुवक अमरावती, यवतमाळ, नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटंबीयांना परस्पर भेटून आर्थिक मदत देणार आहेत.