34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी Farmer ID नोंदणी मोहीम सुरू

वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी Farmer ID नोंदणी मोहीम सुरू

0
49

blank

*वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन*

गोंदिया, दि.25 : राज्यात डिजिटल कृषि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अॅग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे.

वनहक्क अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांची Farmer ID नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह Farmer ID नोंदणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. Farmer ID नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषि सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे. असे जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी कळविले आहे.

blank