31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home गुन्हेवार्ता कोहमारा येथे दोन ट्रेलरच्या धडकेत एक ठार

कोहमारा येथे दोन ट्रेलरच्या धडकेत एक ठार

0
176

ट्रेलरचे केबिन पूर्णपणे चेंदामेंदा झाले. आणि चालक स्टिअरिंगमध्ये अक्षरशः अडकून पडला. अपघाताची माहिती मिळताच कोहमारा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य सुरू केले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर चालकाला केबिनमधून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच गुन्हा नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविले. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून प्रकरणाचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस करीत आहेत.