28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ विदर्भ एक्स्प्रेस २१ दिवस राहणार रद्द;अजनीवरून धावणार

विदर्भ एक्स्प्रेस २१ दिवस राहणार रद्द;अजनीवरून धावणार

0
129

गोंदिया -रेल्वेच्या विविध घेण्यात विकास कामांसाठी आलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे गोंदिया व मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ चे काम आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुनर्विकास कामामुळे महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात व गंतव्य स्थानात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये करण्यात आला आहे. गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील जुने बांधकाम पाडणे आणि नवीन बांधकामाच्या कामासाठी ३ मे ते २३ मे या कालावधीत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी, गाडी संख्या १२१०५/०६ विदर्भ एक्स्प्रेस या कालावधीत गोंदिया स्थानकावर न येता नागपूर ‘अजनी’ स्थानकावरूनच सुटणार असून तिथेच समाप्त होणार आहे. या २१ दिवसांच्या कालावधीत ही गाडी गोंदिया स्थानकावर जाणार नाही. त्यामुळे गोंदिया ते नागपूर दरम्यानच्या प्रवाशांना आता या गाडीसाठी अजनी स्थानकाचा आधार घ्यावा लागणार आहे.