तिरोडा,दि.३०:- तिरोडा शहरातून राष्ट्रीय महामार्ग ७५३ गेला असून विशेषत:सुकडी नाका ते विरसी पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढल्याने अनेकांना प्राण गमावले आहे.याची दखल घेत सर्व विभाग प्रमुखांची आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली.यामध्ये प्रामुख्याने अदानी पॉवर येथील कोळसा व राखेचे दररोज ४०० पेक्षा जास्त वाहतुक करणारे टिप्परमुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शान आले असून याकरिता अदानी ते विर्सी फाट्यापर्यंत स्पीड कंट्रोलदर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले.अदानी गेट क्र.३ च्या समोर ट्राफिक कर्मचारी ठेवणे,ट्रिपल सिटधारकांवर कडक कार्यवाही करणे, १८ वर्षाखालील वाहन चालकांवर कार्यवाही करणे, हेलमेटची शक्ती करणे, टिप्परला सुरक्षा गार्ड आवश्यक करणे,रॅश ड्रायव्हीगवर नियंत्रण ठेवणे, लायसन्सची शक्ती करणे याकरिता परिवहन विभाग व पोलीस विभागाने विशेष लक्ष पुरवून नियमांची अमलबजावणी करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले. या बैठकीला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, उप्विभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, दवणीवाडा पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, गंगाझरी पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, तहसीलदार नारायण ठाकरे, सा.बा.उपविभागीय अभियंता संजय रुद्र्कार, न.प.अध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरीया,न.प.सदस्य संजय बैस, न.प.मुख्याधिकारी अमोल म्हाळकर, अदानी तर्फे विमुल पटेल, कश्यप उपस्थित होते.





