24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home शैक्षणिक ‘पहिले पाऊल’ शाळा प्रवेश तयारी अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन

‘पहिले पाऊल’ शाळा प्रवेश तयारी अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन

0
67

सडक अर्जुनी,दि.३०-जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा जांभळी/ दोडके येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेश तयारी अभियान अंतर्गत प्रवेश मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा उद्देश पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच लहान मुलांना शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे हा होता.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य किशोर पालेवार , भुवन कावळे, काजल कोचे अंगणवाडी सेविका उईके मॅडम व वैशाली बोपचे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी प्रास्ताविकात शाळेतील विविध उपक्रम, शैक्षणिक सुविधा, डिजिटल शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती पालकांना दिली. तसेच “प्रत्येक बालक शाळेत” हा संदेश देत सर्वांनी आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले.या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. अंगणवाडीतील बालकांसाठी विशेष खेळ, स्पर्धा व मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन धम्मदीप साखरे यांनी तर आभार भूवन बागडे यांनी केले.तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किशोर डोंगरवार , धम्मदीप साखरे ,भुवन बागडे , श्यामा कुंडगीर , माया तांदळे यांनी विशेष सहकार्य केले.