28.9 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home रोजगार/व्यापार रिसोड आयटीआयमध्ये पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा उत्साहात; ५० पदांसाठी भरती प्रक्रिया

रिसोड आयटीआयमध्ये पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा उत्साहात; ५० पदांसाठी भरती प्रक्रिया

0
41

वाशिम, दि. 01- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रिसोड येथे २९ एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात एकूण ४ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून सुमारे ५० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ४५ उमेदवार उपस्थित होते. त्यामध्ये २७ मुले व १८ मुलींचा समावेश होता.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रवीण खंडारे यांनी जास्तीत जास्त उमेदवारांनी अशा रोजगार मेळाव्यांचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या कौशल्याच्या आधारे उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना उद्योग क्षेत्राशी थेट जोडण्याची संधी मिळाली. अशा रोजगार मेळाव्यांमुळे कौशल्य विकासाला चालना मिळून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे स्पष्ट झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

blank