30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा स्थापना दिनी स्व. महादेवराव शिवणकर यांचे महाराष्ट्र शासनाने केले कृतज्ञतापूर्वक...

गोंदिया जिल्हा स्थापना दिनी स्व. महादेवराव शिवणकर यांचे महाराष्ट्र शासनाने केले कृतज्ञतापूर्वक गौरव

0
34

आमगाव :-दि. १ मे – गोंदिया जिल्हा स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्याचे शिल्पकार, दूरदर्शी नेतृत्वकर्ते व माजी मंत्री स्व. महादेवराव सुखाजी शिवणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याचा गौरव करत कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत महाराष्ट्र शासनाने त्यांचे गौरव केले.
यावेळी त्यांच्या निवासस्थानी जाऊन माजी मंत्री स्व. महादेवराव शिवणकर यांचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
स्व. महादेवराव शिवणकर यांनी सिंचन, वित्त तसेच विविध विकासकामांच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे संपूर्ण जीवन जनसेवा, विकास आणि समाजहितासाठी समर्पित राहिले असून ते आजही प्रेरणादायी ठरत आहे.यावेळी कार्यक्रमाला आमदार संजय पुराम, शासनाचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी श्रीमती कविता गायकवाड तसेच आमगावचे तहसीलदार नवनाथ कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एड.यसूलाल उपराडे, नरेंद्र बाजपेयी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. महादेवराव शिवणकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. जिल्ह्याच्या जडणघडणीत त्यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांना शतशः नमन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शिवणकर यांच्या कार्याचे शासनाच्या वतीने केलेले स्मरण व गौरव याबद्दल शासनाचे आभार करण्यात आले.

blank