32.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ कामगार दिनानिमित्त तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार

कामगार दिनानिमित्त तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार

0
37

गोंदिया,दि.०१ मेः  मे महिन्यात ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊ नयेत, यासाठी महावितरण गोंदिया परिमंडळातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी केले आहे.ते गोंदिया परिमंडळ कार्यालयात आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

मे महिन्यात नागरिकांना नियमित विजेच्या पुरवठ्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उष्णतेमुळे महावितरणचे अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन बंद पडतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.या समस्येच्या निराकरणासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सदैव तत्परता व सावधानी बाळगावी, असे निर्देश गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुहास रंगारी यांनी दिले आहेत.कार्यक्रमाला अतिथी म्हणून गोंदिया मंडळाचे अधीक्षक अभियंता धानसिंग राठोड, गोंदिया विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद जैन तसेच गोंदिया परिमंडळाचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनंत चवरे उपस्थित होते.कार्यक्रमाला परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अभियंत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली.

blank