लेझीम नृत्य आणि देखाव्यांचे आकर्षण
बुद्ध जयंती उत्साहात साजरी
गोंदिया ता.2 मे:- तथागत बुद्धांची 2589 वी जयंती येथे उत्साहात साजरी झाली.या निमित्त शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. जगमे बुद्ध का नाम हैं येही भारत की शान हैं!बुद्ध धम्म की क्या पहचान -मानव मानव एक समान
आदि घोषवाक्यानी गोंदिया नगरी दुमदुमून गेली. संपूर्ण वातावरण बुध्दमय झाले होते. येथील भीमनगरच्या मैत्रियबुद्ध बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन,डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे यांनी पंचशील झेंडा दाखवून ही रॅली प्रस्थान करण्यात आली.या रॅली मध्य मोठ्यासंख्येने कार, बाईक आणि रथांचा समावेश होता.लेझीम नृत्याची तालीम तसेच रथांवर सजलेले धार्मिक देखावे हे मीरवणुकीतील आकर्षणाचे केंद्र बिंदू होते.देखाव्यांमध्य माता आम्रपाली तथागत बुध्दाला शरण जाणे,धम्म्ममाता सुजाता यांचे तथागत बुद्धांना खीर दान करणे,तथागताने पंचवर्गीय भंतेना मार्गदर्शन करुण प्रथम धम्मचक्र प्रवर्तन करणे आदी देखाव्य मनाला मंत्रमुग्ध करीत होते. या मिरवणुकीत सर्वांनी परिधान केलेले शुभ्र वस्त्र आणि पंचशील झेंडे यांचे आकर्षण ठरले.ही रॅली अत्यंत शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने शहरात मार्गक्रमण करीत होती.विविध बुद्धविहारांकडून पाणी थंडपेय,ताक,आणि लस्शी वितरित करुण बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यामध्ये बोधिसत्व बुद्धविहार,धम्म जणणी, आनंद, चैतन्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लूंबिनी,जेतवन आदी बुद्धिविहार समित्यानी रॅलीचे स्वागत केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. भीमनगर येथील मैत्रियबुद्ध बुद्धविहारात बुद्ध वंदना घेऊन रॅलीची सुरुवात झाली. शहरातील विविध बुद्ध विहारात समितीच्या माजी अध्यक्षानी आणि कार्यकर्त्यांनी तथागताला वंदन केले.रॅलीचे संचालन डॉ राजेश उके,नरेश उके यांनी केले.
जयंती समितीचे कार्यकर्ते,सुशील गणवीर, मच्छिन्द्र भेलावे,अंकुर गजभिये, विलास वासनिक, पंकज वासनिक, नगरसेवक सुनील भरणे,अनंत टेम्भूरकर,संजय वाहने, संतोष शामकुमार,प्रा. सुरेश नंदेश्वर,अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम. एड. एकता गणवीर, सुनील मेश्राम, सविता उके, कोकिळा राहुलकर,पौर्णिमा रामटेके, मनीषा गजभिये, राजश्री गोंडाने, प्रा.खांडेकर, श्री चौरावार किशोर रामटेके, नरेंद्र मेश्राम स्टडी पॉईंट, सुनील मेश्राम, पृथ्वीराज कोल्हटकर यांनी सहकार्य केले.





