गोंदिया,दि.०२ मेः- जिल्हा परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा बिरसोला, केंद्र काटी येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला .त्याप्रसंगी शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केशवजी नागफासे , सरपंचा सरोजिनीबाई दंदरे,कतेलालजी मात्रे ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष राजेश जमरे, बाबुलाल नाग फासे ,कतेलालजी मात्रे, कैलाश दांदरे, माता पालक वर्ग व गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना पुस्तक व बिस्किट वाटप करण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांचे औक्षवन करून प्रत्येकी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व मिठाई वाटण्यात आली. शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक एस. एस. बिसेन यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, मदतनीस व सर्व अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या .





