*महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य
भंडारा –वन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघा च्या संयुक्त विद्यमाने 1 मे रोजी शिवम हाँटेलच्या वातानुकूल सभागृहात 13 वी राज्यस्तरीय पर्यावरण परीषद, 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस संयुक्तिक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा नगराध्यक्ष सौ. मधुरा मिंलीद मदनकर होते. तर विशेष अतिथी म्हणून जि. प उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, माजी भंडारा न. प उपाध्यक्ष सुर्यकात इलमे, महाराष्ट्र युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष डाँ. सोमेश्वर येलचलवार,पर्यावरण प्रदूषण नियंत्रण समिती नागपूर विभागीय अध्यक्ष सुरज परदेशी,लाँयन्स क्लब ब्राससिटि चे अध्यक्ष प्रो. डाँ. बबन मेश्राम, महिला दलित सेना व राजमाता जिजाऊ फांडेशन च्या अध्यक्षा सुनिता परदेशी होते. प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सुनिता उपरीकर, नगरसेविका वृक्षाली ब्राम्हणकर, सामाजिक कार्यकर्ते सौ. हिरणवार, रुद्रिका परदेशी, दिपक वाघमारे, अजय वासनिक,मो.सईदभाई शेख,डाँ. सुलभा मेश्राम आदि मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.त्यानंतर मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ते परमानंद मेश्राम यांनी जागतिक कामगार दिनाचे महत्व विषद करुन कामगार चळवळी चे कार्य सांगितले तर डाँ. सोमेश्वर येलचलवार यांनी पर्यावरण प्रदुषणाचे वाढती समस्या, कारणे व लोकांना याविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्ष भाषणातून नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांनी कामगारच्या कल्याणसाठी शासन कडून राबविण्यात येणारे योजनाची सविस्तर माहिती देवून बुध्द पोर्णिमा, महाराष्ट्र दिन व जागतिक कामागार दिनाच्या शुभेच्छा दिले.त्यानंतर राईस मिल, कारखाना, इतर लघुउद्योग, घरकाम, मजूर, विवीध ठिकाणी काम करणारे पाचशे कामगार यांना जेवनाचे डब्बा देवून सन्मान करण्यात आला.
तसेच सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, सांस्कृतिक, पर्यावरण, उद्योग, व्यापार, आरोग्य, धार्मिक, क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणारे यांना शाँल, भेटवस्तू व सन्मान पुरस्कार देवूध सन्मानित करण्यात आले. त्यात पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी द्वारा प्रशंसित ग्रीन हेरिटेज संस्था चे उपाध्यक्ष चंदा मुरकुटे, अंनिस चे विष्णदास लोणारे, डाँ. सुलभा मेश्राम,जुगलकिशोर गौतम, लता नगधने, विलास केजरकर, शमसेर अब्दुल वहाब खान, मुकेश मेश्राम, मदन कमाने, सुनीता कुरंजेकर, मनोहर चिलझार, सुनिल मोगरे, शैलेश हुमने, धम्मपाल मेश्राम सह इतर मान्यवर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय मेश्राम यांनी तर संचलन डाँ. बबन मेश्राम यांनी व आभार प्रदर्शन सुरज परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सुनील मोगरे, राजकूमार दहिकर, नितीन हटवार, राहूल थोटे, राहुल नागदेवे, अमन तांडेकर, लक्ष्मीकांत दांडेकर, नम्रता बागडे, सुरज पाठदिवटे, विजय बावनकर, हिरामन कुंभारे सह आयोजन समितीचे कार्यकर्ते यांनी अथक परीश्रम घेतले.





