26.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ पाण्याच्या शोधात गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू

पाण्याच्या शोधात गेलेल्या चिमुकलीचा मृत्यू

0
67
; अजंती पारधी बेड्यावर व्यवस्थेची उदासीनता उघड
नेर (जि. यवतमाळ) : नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ९ वर्षीय अन्वी अनाडी भोसले हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली. कडक उन्हात पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना तिला चक्कर येऊन ती कोसळली. स्थानिकांच्या माहितीनुसार, ४४ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे झालेल्या उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजंती पारधी बेड्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून ग्रामपंचायतीकडून १० ते १५ दिवसांतून एकदाच नळ सोडला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांना कडक उन्हात मैलोनमैल पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागते. टिनपत्र्यांच्या घरांमुळे उकाडा वाढतो, वीजपुरवठा अपुरा आहे आणि आरोग्य सुविधा अत्यल्प असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

blank