नागपूर : देशातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने नागपूरमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीच्या ‘फॉरेस्ट इस्टेट’ या प्रीमियम प्लॉटेड प्रकल्पांतर्गत ‘शुभ आरंभ’ कार्यक्रमात एकाच दिवशी ५००हून अधिक भूखंडांचे हस्तांतरण करण्यात आले.
नागपूरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांचे स्वतःच्या भूखंडाचे स्वप्न साकार झाले. ‘शुभ आरंभ’ हा केवळ भूखंड ताबा देण्याचा कार्यक्रम नसून ग्राहकांना नव्या आयुष्याच्या प्रारंभाचा सांस्कृतिक अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीने सांगितले.
‘झिरो माईल’ शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूरच्या वैशिष्ट्यांचा सन्मान करत कार्यक्रमात देशातील विविध भागांतील सांस्कृतिक कलाविष्कार सादर करण्यात आले. उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम भारतातील परंपरांचा संगम या उत्सवात पाहायला मिळाला.
समृद्धी महामार्गाजवळ उभारण्यात आलेल्या ‘फॉरेस्ट इस्टेट’ प्रकल्पाला मुंबई-नागपूर महामार्गाची जोड असून मिहान सेझ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच इतर सामाजिक सुविधा सहज उपलब्ध आहेत. सुमारे २२ लाख चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्रफळ असलेल्या या प्रकल्पात आधुनिक आणि सुनियोजित वसाहतीचा अनुभव देण्यात आला आहे.
कंपनीचे पश्चिम व पूर्व विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभाशिष पटनायक यांनी सांगितले की, “सुनियोजित निवासी वसाहती शाश्वत शहरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नागपूरमधील या प्रकल्पातून उत्तम कनेक्टिव्हिटी, नियोजन आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोन दिसून येतो.”
तर मुख्य डिझाइन व शाश्वतता अधिकारी रोहित मोहन यांनी प्रकल्पातील पर्यावरणपूरक नियोजनावर भर देत सांगितले की, “निसर्ग आणि आधुनिक सुविधा यांचा समतोल साधून दीर्घकालीन राहण्यायोग्य वसाहती निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
सुमारे १११ एकर क्षेत्रात विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पात ४.७५ एकरमध्ये मियावाकी जंगल उभारण्यात आले असून ७० हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय १३.७ एकर हिरवळ, औषधी वनस्पतींच्या बागा, तसेच बोर्डवॉक, कॅम्पफायर आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या वसाहतीत २५ हजार व १० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे दोन भव्य क्लब हाऊस असून जलतरण तलाव, क्रीडा सुविधा आणि ३५हून अधिक आधुनिक सोयी उपलब्ध आहेत. या प्रकल्पामुळे नागपूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रात सुनियोजित आणि शाश्वत विकासाला चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





