गोंदिया,दि.०५ः गोंदिया जिल्ह्यात आज सायकांळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.गोरेगाव,तिरोडा तालुक्यात पावसासह गारपिट सुध्दा पडली असून वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनाचे पत्रे सुध्दा उडाल्याची माहिती गोरेगाव तालुक्यातून आलेली आहे. कापणीस आलेले तसेच शेतात ठेवलेले धान पावसामुळे भिजून खराब झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच घरांचेसुद्धा नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याकरीता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत त्वरित सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून मागणी केली आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत व भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. या प्रकारची मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे





