गोंदिया —सीएमपी इंग्लिश हायस्कूलचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत घवघवीत यशासह जाहीर झाला आहे. कु. खुशी सुहास सुखदेवे हिने 99.60% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शाळेतील 23 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण, 44 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण, 49 विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा अधिक गुण तसेच 58 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि समर्पणाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच लावण्या एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. गजेंद्र फुंडे, शाळेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.





