28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डी.एम.एल.टी. परीक्षेमध्ये घवघवीत यश

एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना डी.एम.एल.टी. परीक्षेमध्ये घवघवीत यश

0
25

गोंदिया,दि.२४ः- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात येणाÚया डी.एम.एल.टी. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल दि. 24/06/2026ला लागला असुन या मध्ये एम.जी. पॅरामेडिकल कॉलेज मुर्री चौकी, गोंदियाच्या 100% निकाल लागलेला आहे. . एप्रिल 2026 मध्ये झालेल्या परिक्षे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. तृप्ती सहारे या विद्यार्थीनीने 90.44% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
त्याच्यां पाठोपाठ कु. नंदिनी खोटेले 84.67%, कु. सुजाता भेंडेकर 82.56%, कु. स्मिता हत्तिमारे 80.89%, कु. हर्षदा भोयर 80.11%, गुण घेऊन यश संपादन केलेला आहे.जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल कॉलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात.
विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय कॉलेजचे संचालक श्री अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चौधरी, प्रा. प्रज्ञा गावंडे, प्रा. आकाश श्रोते, श्री राजु रहांगडाले, श्री राजाभाऊ उंदिरवाडे, श्री प्रितम साठवने, श्रीमती योगेश्वरी ठवरे, व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

blank