
तिरोडा-नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील आठवी उत्तीर्ण होऊन नववीत जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसोबत शिक्षण समिती सभापती देवेंद्र तिवारी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
नवनिर्वाचित शिक्षण सभापती देवेंद्र तिवारी यांनी तिरोडा नगर परिषदेच्या गांधी विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांनी पालकांना आश्वासन दिले की, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले जाईल. असे पालकांना आश्वासन दिले की, येत्या काळात नगरपरिषद प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गांधी विद्यालयातील सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू. आमचे लाडके आमदार विजयभाऊ रहांगडाले, नगर परिषदेचे अध्यक्ष अशोकजी असाटी आणि माझ्यावर विश्वास ठेवून, त्यांनी आपल्या मुलांना गांधी विद्यालयात नववीत प्रवेश देण्याचे वचन दिले आहे. आजचे हे आमचे पहिले यश आहे. प्रयत्न केलेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सभापती देवेंद्र तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




