35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता जि.प.च्या वित्तविभागात एसीबीची धाड,कारवाई सुरु

जि.प.च्या वित्तविभागात एसीबीची धाड,कारवाई सुरु

0
778

blank

गोंदिया,दि.११ः गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ११ मे रोजी धाड घालत वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ लिपिक संदेश सांभरे नामक कर्मचार्यास ४५ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले असून सध्या कारवाई सुरु आहे.जिल्हा परिषदेतंर्गत सेवानिवृत्त झालेल्या एका शिक्षकाकडून पेंशनचे पे फिक्शेसन बरोबर नसल्याचे सांगून १ लाख ९२ हजाराची वसुली वाचवून देण्याच्या नावे ५० हजार रुपयाची मागणी करुन ४५ हजाराची लाच स्विकारतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.सांभरे यांनी ७ मे रोजी सेवानिवृत्तीची कागदपत्रे व इतर मुद्दे निकाली काढून देण्याकरीता तक्रारदारास लाचेची मागणी केली होती.त्यानुसार तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने आज ११ मे रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली,तक्रार नोंदवल्यानंतर एसीबीने दुपारच्या सुमारास सापळा रचला दरम्यान तडजोडीअंती ४५ हजाराची रक्कम घेतांना ताब्यात घेण्यात आले. कनिष्ट लिपिकांने कुणाच्या सांगण्यावरुन मागितली हा सुध्दा तपासाचा मुद्दा राहणार आहे.

blank