29.8 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ प्रसिध्दीसाठी आमदाराची फलकबाजी,पण सात गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा केव्हा?

प्रसिध्दीसाठी आमदाराची फलकबाजी,पण सात गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा केव्हा?

0
185

गोंदिया,दि.१४ः-आमगाव नगर पंचायत व नगर पालिकेच्या फेऱ्यातून अद्यापही सुटलेली नाही. अशी स्थिती सद्या वर्तमान काळात दिसून येत आहे. न्यायालयाने दिड वर्षापुर्वी हा वाद मिटवित नगर पालिकेत समाविष्ट त्या सात गावांना वेगळे करीत स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा बहाल करण्याचे निर्देश दिले तर आमगावला नगरपंचायतचा दर्जा बहाल केला. मात्र त्या सात गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल झाला नाही. तर दुसरीकडे आमगाव नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या नाही. यामुळे येथील विकास पुर्णतः ठप्प पडला आहे.विशेष म्हणजे या मतदारसंघाच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांने तर आपल्यामुळेच या गावांना न्याय मिळाल्याची फलकबाजी केली होती.मात्र त्या फलकबाजी नंतरही त्या गावांना अद्यापही न्याय न मिळाल्याने आमदारांची प्रसिध्दीसाठी स्टटंबाजीच होती की काय अशी म्हणायची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे.
आमगावला सन २०१४ मध्ये नगर पंचायतचा दर्जा देण्यात आला. मात्र त्यानंतर रिसामा, बनगाव, म्हाली, किडंगीपार, कुंभारटोली, बिरसी, पदमपूर ही गावे समाविष्ट नगर पालिकेचा दर्जा देण्यात आला. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने दिड वर्षापुर्वी पुन्हा ती सात गावे वेगळी करून आमगावला नगर पंचायतचा व त्या गावांना ग्रामपंचायतचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय दिला. मात्र प्रत्येक्षात ग्रामपंचायतचा दर्जा या गावांना बहाल झालेला नाही. विशेष म्हणजे आमगावला नगरपंचायत व त्या सात गावांना
झालेला दर्जा बहाल हा माझ्याच प्रयत्नाने झाल्याचे आमदार संजय पुराम यांनी होर्डिंग बॅनर लावून प्रचार प्रसिद्धी करीत आहेत. मात्र प्रत्येक्षात वस्तूस्थिती वेगळीच असल्याने याचा आता विरोध होऊ लागला आहे. दिड वर्षापुर्वी २३ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायतीचा दर्जा त्या सात गावांना देण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र अद्यापही ती गावे ग्रामपंचायतीच्या दर्ज्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे या सात गावांना दर्जा बहाल का होत नाही, या चिंतनाचा विषय असून याला सर्वस्वी लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

blank