32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र राज्यात 216 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या,गोंदियातील ५ आरएफओंचा समावेश

राज्यात 216 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या,गोंदियातील ५ आरएफओंचा समावेश

0
230

blank

-प्रशासकीय कारणास्तव निर्णय
-तत्काळ रुजू होण्याचे आदेश, अन्यथा कारवाई
गोंदिया,दि.१४-राज्यातील वनविभागात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करत महसूल व वन विभागाने तब्बल 216 वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले. गट-ब मधील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. विशेष कार्य अधिकारी उदय ढगे यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित करण्यात आले.

गोंदिया जिल्ह्यात विशेष व्याघ्र सरंक्षण दल ३ गोंदिया या पदावर देवलापार येथील अभिजित इलमकर,सामाजिक वनिकरण तिरोडा येथील शेषराज आकरे यांची आमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर,कु.अभिलाषा सोनटक्के यांची कुही येथे,मनोज गाढवे यांची वनपरिक्षेत्र अधिकारी(वन्यजीव)डोंगरगाव,जि.गोंंदिया येथे,डोंगरगाव येथील कु.छबुलता भडांगे यांची बुटीबोरी,.बोंडे येथील सुनिल मडावी यांची वरोरा,पिटेझरी येथील सागर बारसागडे यांची ताडोबा बपर वपअ पळसगाव येथे,नवेगावबांधे वपअ सदाशिव अवगान यांची मोहर्री(जि.चंद्रपूर),कामठी येथील प्रशांत हुमने यांची वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया या पदावर बदली करण्यात आली आहे.आल्लापल्ली येथील निलेश्वर वाडीधरे यांची सामाजिक वनीकरण तिरोडा,कळमेश्वर येथील प्रविण शिरपुरकर यांची वपअ (वन्यजीव)बोंडे,जि.गोंदिया, कारंजा(जि.वर्धा) येथील वपअ नरेंद्र सांवत यांची वपअ नवीन पिटेझरी(वन्यजीव) येथे व अकोला येथील विश्वास थोरात यांची वपअ विशेष व्याघ्र सरंक्षण दल २,वडेगाव येथे बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कामकाजातील विलंब रोखण्यासंदर्भातील कायदा व विविध शासन निर्णयांचा संदर्भ देत ही प्रक्रिया राबविण्यात आली. बदलीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नव्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठरावीक कालावधीत रुजू न झाल्यास शिस्तभंग कारवाई तसेच अनुपस्थितीचा कालावधी ‘अकार्य दिन’ म्हणून गणला जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
विदर्भातील पेंच, मेळघाट, ताडोबा, नवेगाव-नागझिरा, सामाजिक वनीकरण विभाग, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूरसह सर्व 11 जिल्ह्यांतील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. वनविभागातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढविणे, दीर्घकाळ एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची फेरबदल करणे आणि कामकाजात गती आणणे, हा या मोठ्या बदल्यामागील मुख्य उद्देश मानला जात आहे.

blank