25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ “योजना सामाजिक न्यायाच्या” पुस्तिकेतून मागासवर्गीयांना योजना जाणून घेण्याची मदत होईल: जिल्हाधिकारी डॉ.गोंदावले

“योजना सामाजिक न्यायाच्या” पुस्तिकेतून मागासवर्गीयांना योजना जाणून घेण्याची मदत होईल: जिल्हाधिकारी डॉ.गोंदावले

0
126

गोंदिया, दि. 14 : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या योजना सामाजिक न्यायाच्या या पुस्तिकेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना त्यांच्या योजना जाणून घेण्याची मदत होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदवले यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात “योजना सामाजिक न्यायाच्या” ही पुस्तिका जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांना जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर यांनी भेट दिली.

“योजना सामाजिक न्यायाच्या” या पुस्तकामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती आहे. पुस्तिकेत एकूण 53 योजनांची माहिती दिली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आणि इतर मागासवर्गीय नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तकाचे कौतुक करीत अशा उपयुक्त प्रकाशनामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. गोंदावले यांनी सांगितले. यावेळी समाज कल्याण निरीक्षक स्वाती राजेंद्र कापसे उपस्थित होत्या.