34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News गडचिरोली पोलीस दलाचे माओवादावर “ऑपरेशन अंतिम प्रहार”८ माओवादी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

गडचिरोली पोलीस दलाचे माओवादावर “ऑपरेशन अंतिम प्रहार”८ माओवादी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

0
79

blank

गडचिरोली,दि.१६ः गडचिरोली पोलीस दल व सीआऱपीएफने सयुंक्त कारवाई करीत 07 फेब्राुवारी 2026 रोजीच्या फोदेवाडा चकमकीमध्ये एका सी-60 जवानाच्या हत्येत सक्रिय सहभाग असलेल्या जहाल माओवाद्यांसहीत एकूण 08 माओवाद्यांना अटक केली.त्यामध्ये दोन डीव्हीसीएम, दोन पीपीसीएम व चार सदस्याचा समावेश आहे.यांच्याकडून लपवून ठेवलेला शस्त्रसाठा तसचे एकुण 65 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम जप्त करुन गडचिरोली पोलिसांनी माओवादावर “ऑपरेशन अंतिम प्रहार” यशस्वी केले आहे.
अटक केलेल्या माओवाद्यामध्ये कंपनी क्र. 10 चा प्रभारी डिव्हीसीएम राजु मंगलु वेको व त्याची पत्नी जन्नी ऊर्फ नगी येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. 10) यांस 01 एके 47 रायफल, 01 .303 रायफल व 01 बारा बोअर रायफलसह मौजा कुमनार येथून,नैताळा येथून 02 महिला माओवाद्यांना त्यांच्या 01 एसएलआर रायफल, 01 बारा बोअर रायफल, 01 सिंगल शॉट रायफल व इतर माओवादी साहित्यासह घेण्यात आले.महाराष्ट्र शासनाने आठही माओवाद्यांवर  64 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
या अभियानादरम्यान 02 एलएमजी रायफल, 04 एके 47 रायफल, 04 एसएलआर रायफल, 03 इंन्सास रायफल सह माओवाद्यांकडून एकुण 51 अग्निशस्त्र जप्त करण्यात आल्याने  गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही.blank

गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद जवळजवळ संपुष्टात आला असून माओवाद्यांची गडचिरोली जिल्ह्रातील हालचाल देखील जवळजवळ संपुष्टात आली आहे.माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विशेष शोध मोहीम राबविण्यात येऊन गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन अंतिम प्रहार” राबविण्यात येत होते. यावरून गडचिरोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने तेलंगाणा राज्यातून 04, मौजा कुमनार येथून 02 आणि मौजा नैताळा येथून 02 अशा एकूण 08 माओवाद्यांना अटक केली आहे.

दि. 12/05/2026 रोजी विशेष अभियान पथक, प्राणहिता येथील एक पोलीस पथक गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधार रुकमापूर रेल्वे स्टेशन, जि. विकाराबाद (तेलंगाणा) येथे रवाना झाले होते. 13 मे 2026 रोजी सदर रेल्वे स्टेशन येथे पोहचताच मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत असताना, स्टेशन वरील 03 अनोळखी पुरुष व 01 अनोळखी महिला यांनी पोलीस पथकास पाहून संशयास्पद हालचाल करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन अत्यंत शिताफिने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे 1) जयराम मोंगे गावडे, (पीपीसीएम कंपनी क्र. 10) रा. गिनलगुडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, 2) मुकेश ऊर्फ लच्छु लक्कु अवलाम (प्रभाकर याचा बॉडीगार्ड), रा. पिडीया, ता. गंगलूर, जि. बीजापूर (छ.ग.) 3) विजय ऊर्फ मंगडू हंुगा तामो (झोन टीडी सदस्य) रा. चिमलीपेंटा, ता. कोटा, जि. सुकमा (छ.ग.), व 4) रजिता ऊर्फ शामबत्ती कोसा मडावी (सदस्य कोअर दलम, कंपनी क्र. 05), रा. कोंडाकोट, जि. नारायणपूर (छ.ग.) असे असल्याचे सांगितले.सदर चौघे इसम हे पोलीसांच्या अभिलेखावरील माओवादी असून या चारही माओवाद्यांंचा दि. 07 फेब्राुवारी 2026 रोजी मौजा फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना उपपोस्टे लाहेरी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 01/2026 कलम 103, 109, 132, 121 (1), 189(2), 190, 191 (2), 191 (3) 61 (2) भा.न्या.स., सहकलम 3/25, 5/27 भाहका, कलम 3, 4, 5, भास्फोका, कलम 13, 16, 18, 20, 23 बेकायदा कृत्य अधि. व कलम 135 महा. पो. अधि. या गुन्ह्रात दि. 13/05/2026 रोजी अटक करण्यात आली आहे. या दरम्यान अटक माओवाद्यांच्या माहितीवरून पोलीस पथकांनी दि. 15/05/26 रोजी फोदेवाडा जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून एक .303 रायफल, 02 बारा बोअर रायफल, 10 जिवंत राऊंडसह मोठ¬ा प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोस्टे लाहेरी हद्दीतील मौजा कुमनार गावात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वात शोध अभियान सुरु असताना पोलीस पथकास काही सशस्त्र माओवादी गावात लपून बसल्याचे दिसून आले होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच लपून बसलेल्या माओवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने गोळीबार न करता दोन माओवाद्यांचा अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यांना त्यांच्या 01 एके 47 रायफल, एक .303 रायफल, 01 बारा बोअर रायफल व इतर माओवादी साहित्यासह ताब्यात घेतले. सदर दोन्ही माओवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी 1) राजु उर्फ मंगडु वेको (डिव्हीसीएम, कंपनी क्र. 10) व 2) जनी उर्फ नगी उंगाल येमला (पीपीसीएम, कंपनी क्र. 10) असल्याचे निष्पन्न झाल्याने उपपोस्टे लाहेरी येथे भा. न्या. सं. कलम 189 (2), 61, म. पो. अधि. 1951 कलम 135, भा. ह. का. 1959 कलम 3/25, भास्फोका कलम 3, 4, 5, बेकायदा कृत्य अधि. कलम 13, 16, 18, 20, 23 अन्वये अप क्र. 05/2026 दाखल करून अटक करण्यात आली. पोमकें बंगाडी हद्दीतील मौजा गुंडेनुर जंगल परिसरात पोलीस जवानांवर घातपात करून हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रे व दारूगोळा लपवून ठेवले असल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलीस पथकांनी आज दि. 16/05/26 रोजी गुंडेनुर जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून 01 एसएलआर एलएमजी रायफल, 01 इंन्सास एलएमजी रायफल, 03 एके 47 रायफल, 03 एसएलआर रायफल, 02 इंन्सास रायफल, एक .303 रायफल, 01 देशी बनावटीची हत्यार, 01 बिजीएल लाँचर, 18 मॅग्जिन, 358 जिवंत काडतुस सह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच सदर ठिकाणावरुन एकुण 63 लाख 84 हजार रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.पोमके गर्देवाडा हद्दीतील मौजा नैताळा गावात शोध अभियान सुरु असताना पोलीस पथकास काही सशस्त्र माओवादी गावातील घरांचा आडोसा घेऊन लपून बसल्याचे दिसून आले होते. पोलीस पथकाची चाहूल लागताच लपून बसलेल्या माओवाद्यांनी गावालगतच्या जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून गोळीबार न करता दोन माओवाद्यांना त्यांच्या 01 एसएलआर रायफल, 01 बारा बोअर रायफल, 01 सिंगल शॉट रायफल शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. मात्र यावेळी काही माओवादी जंगलाचा फायदा घेत तेथून पसार झाले. ताब्यात घेतलेल्या माओवाद्यांची कसून चौकशी केल्यानंतर ते पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी 1) ज्योती उर्फ अकिला उर्फ समिता पोटावी (डिव्हीसीएम, झोन टीडी टेक्नीकल) व 2) आमती उर्फ आयती उर्फ संध्या इडमा पोडीयाम (सदस्य, कंपनी क्र. 10) असल्याचे निष्पन्न झाल्याने पोस्टे वांगेतुरी येथे भा. न्या. सं. कलम 189 (2), 61, म. पो. अधि. 1951 कलम 135, भा. ह. का. 1959 कलम 3/25, भास्फोका कलम 3, 4, 5, बेकायदा कृत्य अधि. कलम 13, 16, 18, 20, 23 अन्वये अप क्र. 03/2026 दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही माओवाद्यांना मा. न्यायालयाने दि. 15/05/2026 ते दि. 22/05/2026 पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. यादरम्यान दोन्ही माओवाद्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पोमके गर्देवाडा हद्दीतील मौजा नैताळा जंगल परिसरात पोलीस जवानांवर घातपात करून हल्ला करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रे व दारूगोळा लपवून ठेवले असल्याचे सांगितले होते. या माहितीवरून पोलीस पथकांनी आज दि. 16/05/26 रोजी मौजा नैताळा जंगल परिसरात शोध अभियान राबविले असता, सदर ठिकाणावरून 01 इंन्सास रायफल, एक .303 रायफल, 08 बारा बोअर रायफल, 04 डेटोनेटर, 04 मॅग्जिन, 66 जिवंत काडतुस, 11 बिजीएल सेल, 01 बिजीएल लाँचर सह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून पोलीस दलाच्या अभिलेखावरील 06 पैकी 05 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून एक महिला माओवादी नामे मोनी मडावी कंपनी क्र. 10 सदस्य हिने देखिल बिजापूर (छ.ग.) येथे आत्मसमर्पण केल्याने पोलीस दलाच्या अभिलेखावरील एकही माओवादी शिल्लक राहिलेला नाही.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान), नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र योगेश कुमार, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड  अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी  योगेश रांजणकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, विशेष अभियान पथक, गडचिरोली येथील अधिकारी व जवान यांनी पार पाडली.

blank