29.4 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ मोहाडी येथे ओबीसी बांधवाचा जनगणेवर बहिष्कार

मोहाडी येथे ओबीसी बांधवाचा जनगणेवर बहिष्कार

0
81

ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्याची ठाम मागणी
गोरेगाव,दि.२३ः- देशांतर्गत होणाऱ्या जणगणेमधे इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीचा रकाना नसल्याने ही जणगणना आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाज बांधव या जणगणेवर बहिष्कार करित असल्याचे प्रतिपादन समस्त मोहाडी येथील सर्व ओबीसी समाज बांधवानी केले आहे. समाज बांधवाची सभा ही माता चौक मोहाडी येथे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी समस्त ओबीसी बांधवांनी जणगणेचा तीव्र विरोध करून बहिष्कार केला.
केंन्द्र सरकारकारनी ओबीसीची जणगणा करण्याची मान्यता दिली होती मात्र मे २०२६ मध्ये होणाऱ्या संपूर्ण भारतभर जणगणेत ओबीसी करिता स्वतंत्र रकानाच नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवाची जणगणना होणारच नाही, हे सर्व समाज बांधवांना समजले त्यामुळे या देशामध्ये बहुसंख्य ओबीसी असलेल्या समाजाची जणगना होणार नाही. तर ओबीसी समाज बांधवाना मिळणाऱ्या सोई सुविधा , पुढील पिढीला मिळणाऱे आरक्षण यापासून वंचित राहावे लागेल. हे लक्षात घेऊन ओबीसी समाज बांधवानी एल्गार पुकारत जणगणेवर बहिष्कार घातला आहे. ओबीसीचा रकाना नसने हे मुद्दाम केंद्र सरकारने केले आहे. ओबीसीचा रकाना नसने म्हणजे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करून ओबीसी समाजाला सोई सुविधा पासुन वंचित ठेवण्याचा घाट आहे.ओबीसीची नोंद न घेणे म्हणजेच भाविष्यातील आरक्षण कल्याणकारी योजना व हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रकार अल्याचा आरोप बबलू कटरे यांनी केला आहे.यावेळी बहुसंख्य ओबीसी समाज उपस्थित होते. नंतर गोरेगाव तहसीलदार यांच्या मार्फतराष्ट्रपती व गृहमंत्री भारत सरकार व जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहाडी ग्रांम पंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.जे.पटले,सेवानिवृत्त शिक्षक वाय.एफ.पटले,प्रमानंद तिरेले,शिवराम मोहनकार,आदी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

blank