26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home मराठवाडा/खान्देश परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
43
परभणी ,दि.०१-शिवसेना-महायुतीचे परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा. सईद खान यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आज मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात दाखल करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री मा. मेघनाताई बोर्डीकर, आमदार मा. संतोषजी बांगर, विधान परिषद सदस्य मा. हेमंत पाटील तसेच शिवसेना-भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महायुतीच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची ताकद सोबत असल्याने मा. सईद खान यांचा विजय निश्चित असून परभणी-हिंगोलीच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

blank