28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ स्पर्धा परीक्षेतील यशाचा गौरव; सार्वजनिक वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव प्रयत्न करणार –...

स्पर्धा परीक्षेतील यशाचा गौरव; सार्वजनिक वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव प्रयत्न करणार – भाजयुमो पूर्व जिल्हाध्यक्ष ओम कटरे

0
90

तिरोडा, दि.02 : स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून अनेक युवक-युवतींना शासकीय सेवेत नियुक्ती मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक वाचनालयांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन भाजयुमो पूर्व जिल्हाध्यक्ष श्री. ओम कटरे यांनी दिले.

तिरोडा तालुक्यातील श्रीमती जयतुराबाई बिसेन सार्वजनिक वाचनालय, चिरेखनी यांच्या वतीने पोलीस दलात नवनियुक्त कुमारी दीक्षा साठवणे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. कटरे यांनी वरील आश्वासन दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे सचिव आर. टी. बिसेन गुरुजी होते. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य खुशाल कटरे, सेवानिवृत्त शिक्षक ललितकुमार रहांगडाले, समाजसेविका सौ. हेमलता रहांगडाले, कोषाध्यक्ष प्रा. छत्रपती बिसेन, सहसचिव सौ. कीर्ती बिसेन आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रा. छत्रपती बिसेन यांनी शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये वाचनालयातील एकूण नऊ यशस्वी वाचक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन विविध शासकीय सेवांमध्ये रुजू झाल्याची माहिती दिली.यावेळी प्रमुख वक्ते खुशाल कटरे यांनी यशस्वी विद्यार्थी, वाचन संस्कृती आणि वाचनालय प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सत्कारमूर्ती कुमारी दीक्षा साठवणे यांनी मनोगत व्यक्त करताना चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास, वाचनाची आवड, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच यश संपादन करता येते, असे विद्यार्थ्यांना सांगितले.कार्यक्रमाचे संचालन दिनेश तुमसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल सौ. लक्ष्मी साहेबराव बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयातील वाचक मित्रांनी विशेष परिश्रम घेतले.

blank