28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वाशिम जिल्हा टीमची खैरी-वलमाझरी  ग्रा. पं. ला भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान वाशिम जिल्हा टीमची खैरी-वलमाझरी  ग्रा. पं. ला भेट

0
34

भंडारा  दि:२ साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी ग्रामपंचायतीला  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या टीमने ३ जुन रोजी भेट दिली ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची व प्रशासकीय कामकाजाची सखोल पाहणी केली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, डिजिटल सुविधा तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेले उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेण्यात आली.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी मूल्यांकन चमूचे अध्यक्ष म्हणुन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौव्हाण, सदस्य म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, वृत्तपत्र प्रतिनिधी यशवंत हिवराळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे

 यांचा समावेश होता. चमूने खैरी-वलमाझरी ग्रामपंचायती मधील विविध विभागांना व कामाच्या ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी खैरी-वलमाझरी  ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे,यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची, योजनांची तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून होत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती चमु समोर मांडली. गावाच्या स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रगतीची माहिती देण्यात आली.याप्रसंगी साकोली पंचायत समिती गटविकास अधिकारी पि.व्हि.जाधव, सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे,उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे,आशा वर्कर माया तिरपुडे, ,अंगणवाडी सेविका चंद्रकला कापगते, यांच्या सह ग्राम पंचायत सदस्य ,कर्मचारी ,गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank