36.6 C
Gondiā
Wednesday, June 3, 2026
Home Top News भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी ‘नीट एमडीएस’ परीक्षेत देशात पहिली!

भंडाऱ्याची डॉ. नमीरा सिद्दीकी ‘नीट एमडीएस’ परीक्षेत देशात पहिली!

0
48

भंडारा : वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विदर्भाने अभिमान बाळगावा अशी कामगिरी भंडाऱ्याच्या मुलीने केली आहे. नागपूरच्या दंत महाविद्यालयातून बीडीएसची पदवी मिळालेल्या डॉ. नमीरा सिद्दीकी यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत संपूर्ण देशातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. डॉ. नमीरा यांनी ‘नीट एमडीएस’ प्रवेश परीक्षेत देशभरातील ३१ हजार विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक ८०२ गुण प्राप्त करीत प्रथम ऑल इंडिया रँक प्राप्त केली आहे.

मूळच्या भंडारा शहरातील रहिवासी डॉ.नमीरा सिद्दीकी यांचे वडील मो. गालिब सिद्दीकी यांचा भंडाऱ्यात सुपर मार्केटचा व्यवसाय आहे. त्यांनी वानाडोंगरी, हिंगणा येथील स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयातून बीडीएस पदवी प्राप्त केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांचे बीडीएस पूर्ण झाले. त्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांनी मार्च २०२६ मध्ये एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली. इंटर्नशीपच्या काळातच त्यांनी ‘नीट एमडीएस’ची तयारी सुरू केली हाेती. ही प्रवेश परीक्षा २ मे २०२६ रोजी पार पडली, ज्यामध्ये देशभरातून ३१,४०७ दंत चिकित्सक सहभागी झाले होते.

मंगळवारी या परीक्षेचा निकाल लागला आणि सिद्दीकी कुटुंबात आनंद पसरला. डॉ. नमीरा यांनी एकूण ९६० पैकी ८०२ गुण प्राप्त करीत देशात टॉप केले. डॉ. नमीरा यांना या अत्युच्च यशासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.इंटर्नशीपदरम्यान वेळ मिळाला की लायब्ररीत अभ्यास आणि घरी आल्यानंतर पुन्हा रात्रभर अभ्यास करायच्या. २४ तासात केवळ दोन ते तीन तासाची झोप घेत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यापुढे दिल्लीच्या मौलाना आझाद दंत महाविद्यालयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाने भंडारा, आणि विदर्भासाठीही गर्वाचा क्षण दिला आहे.

देशातून पहिला क्रमांक मिळणे हा अत्याधिक आनंदाचा क्षण आहे. मेहनत घेतली की त्याचे फळ निश्चितच मिळते, या गाेष्टीवर विश्वास दृढ झाला आहे. मी ज्या व्यवसायात आहे, त्यात दयाळूपणा अत्यंत आवश्यक आहे, कारण गरजू माणसे तुमच्यावर भरवसा ठेवून येत असतात. या विश्वासाला तडा जाणार नाही, यासाठीच मी पुढच्या आयुष्यात प्रयत्न करणार आहे. – डॉ. नमीरा मो. गालिब सिद्दीकी, ऑल इंडिया टॉपर