33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ सालेकसा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांची दौरा; विविध योजनांची पाहणी

सालेकसा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांची दौरा; विविध योजनांची पाहणी

0
7

blank

गोंदिया 14: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणी शनिवारी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.मौजा रोंढा येथे एचडीएफसी बँक व सीडब्ल्यूएस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. महिला बचत गटांना देण्यात आलेल्या टूलकिट, डिजिटल शाळा, सोलर लिफ्ट सिंचन पद्धती, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसाय यांचा आढावा घेतला. यावेळी महिलांशी संवाद साधून शासनाच्या योजनांचा लाभ देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर तहसील कार्यालय सालेकसा येथे भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली व परिसरात वृक्षारोपण केले. हाजराफॉल वन पर्यटन स्थळाला भेट देऊन पर्यटन विकासासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.मौजा जमाकुडो येथे माविम अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची पाहणी करताना बांबूपासून वस्तू तयार करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.मौजा गिरोला येथे ‘डार्क केटल जंगल कप 2026-27’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रानमेवा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याच्या सूचना देण्यात आल्या.सायंकाळी भजेपार येथील स्मार्ट ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. ग्रामपंचायतीच्या कामाचे त्यांनी कौतुक केले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व वाचनालयाचीही पाहणी केली.या दौऱ्यात तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, नायब तहसीलदार श्रीमती अमृता सुतार व महसूल सहाय्यक आशिष रामटेके उपस्थित होते.