26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राजकीय गोरेगाव तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर..

गोरेगाव तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर..

0
135

गोरेगाव : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोरेगाव तालुक्याची नवी कार्यकारिणी भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीअंतर्गत तालुकाध्यक्ष रविंद्र (रवि) पटले यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. संघटन विस्तार, सामाजिक कार्य, जनसंपर्क तसेच पक्षाच्या विचारसरणीचा प्रभावी प्रचार-प्रसार या उद्देशाने या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीनुसार, भाजयुमो गोरेगाव मंडळाच्या सरचिटणीसपदी किरण पालेवार, अजय राहंगडाले आणि खोमेंद्र पारधी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपस्थित वरिष्ठ पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.या बैठकीला माजी आमदार हेमंतभाऊ पटले, डॉ. लक्ष्मणभाऊ भगत (बांधकाम सभापती), चित्रकलाताई चौधरी (पंचायत समिती सभापती), जिल्हा सरचिटणीस मनोज बोपचे, पुष्पराज जनबंधू, अभय मानकर, विक्की बघेले, अजीत टेंभरे यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.