
गोंडजेवली तांडा शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
नांदेड दि 15(ता.किनवट ) येथील जिल्हा परिषद शाळा, गोंडजेवली व गोंडजेवली तांडा येथे प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची जुनी रुडी परंपरा हलगीच्या तालावर वाजवत ट्रॅक्टरतून वाजत-गाजत मिरवणूक काढून शाळेत प्रवेशोत्सव घेण्यात आला.
फेटे बांधलेल्या विद्यार्थ्यांचे ‘ ट्रॅक्टर ‘मधून शाही स्वागत
विद्यार्थ्यांची गोंडजेवली तांडा गावचे नायक बळीराम पवार यांच्या ट्रॅक्टर गाडीतून या नव्या चिमुकल्यांना वाजत-गाजत मोठ्या दिमाखात शाळेत आणण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमात शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शाळा परिसर आकर्षक रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आला होता.
या शानदार प्रवेशोत्सवासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती तसेच याशिवाय परिसरातील माता-पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या आनंददायी सोहळ्याचे प्रास्ताविक व सर्व उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आंबादास राठोड,राजकुमार चव्हाण यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे, विकास म्यानपवार यांनी मानले.दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक दृष्टिकोन यामुळे गोंडजेवली व तांडा जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता दिवसागणिक वाढत असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या उत्साही वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस एक अविस्मरणीय आठवण ठरला.




