33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Top News यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची भेट

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची भेट

0
8

जखमींची विचारपूस, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले

प्रशासनाला तत्पर उपचारांचे निर्देश

परभणी, दि. २१ – यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आलेल्या बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला.

त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच उपचारांबाबत डॉक्टर आणि प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न होता तातडीने आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले.blank

या दुःखद प्रसंगी प्रभावित कुटुंबियांसोबत शासन व प्रशासन ठामपणे उभे आहे. सर्व नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि गरज भासल्यास केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी केले आहे.