चित्रा कापसे/तिरोडा-कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न गोंदिया जिल्हा कराटे-डो असोसिएशनच्या वतीने दि. २६ जून रोजी जिल्हा परिषद उत्तर बुनियादी शाळा, तिरोडा येथे कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत २० खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली.
यशस्वी खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार ब्लॅक बेल्ट, ब्राऊन बेल्ट, ग्रीन बेल्ट, ऑरेंज बेल्ट आणि यलो बेल्ट तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक असाटी, तालुका क्रीडा संयोजक अमन नंदेश्वर,विकेश मेश्राम,राजेश वरठे,सेन्साई दीपक घरजारे आणि सेन्साई चंद्रप्रकाश प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कराटे हे आत्मसंरक्षण, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी या कलेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.





