29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home क्रीडा तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

0
2

गोंदिया, दि.3 : भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Awards – TNNAA) सन 2025 करीता पात्र व्यक्तींकडून नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

हा पुरस्कार जमिनीवरील, जल (पाणी) व हवाई साहसी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो. तसेच साहसी क्षेत्रातील उल्लेखनीय आजीवन योगदानासाठी (Lifetime Achievement) स्वतंत्र पुरस्कारही देण्यात येतो.

नामांकनासाठी अर्जदाराची कामगिरी सन 2023, 2024 व 2025 या कालावधीतील अत्युत्कृष्ट स्वरूपाची असणे आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र साहसी खेळाडू, साहसी संस्था तसेच संबंधितांनी दि.20 ऑगस्ट 2026 पर्यंत केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी कळविले आहे.