24.2 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home मराठवाडा/खान्देश रोहिला पिंपरी–कसर सिमेंट रस्त्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन

रोहिला पिंपरी–कसर सिमेंट रस्त्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भूमिपूजन

0
36
परभणी, दि. २८  : ग्राम सडक योजना टप्पा–२ (TWT) अंतर्गत रोहिला पिंपरी ते कसर या महत्त्वपूर्ण सिमेंट रस्ता विकासकामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.या रस्त्याचे महत्त्व अधोरेखित करताना पालकमंत्री यांनी सांगितले की, या कामामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शिक्षण, आरोग्य, शेती व व्यापार क्षेत्राला चालना मिळेल.मजबूत आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असून या रस्त्यामुळे स्थानिक विकासाला नवी गती मिळेल. गावांच्या सर्वांगीण प्रगतीसह ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.