36.8 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home Top News राजगडाकडे निघालेल्या २० पर्यटकांची बस थेट दरीत! दोघांचा मृत्यू!

राजगडाकडे निघालेल्या २० पर्यटकांची बस थेट दरीत! दोघांचा मृत्यू!

0
16
मुंबई-अंधेरी परिसरातील २० जणांचा गट वीकेंडला ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने राजगड किल्ल्याकडे निघाला होता. रविवारी सकाळच्या सुमारास त्यांची बस वेल्हा आणि खानापूर दरम्यानच्या दुर्गम पाबे घाटात आली असता, एका धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही ट्रॅव्हल्स थेट रस्त्यावरून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
ऐतिहासिक राजगड किल्ला (Rajgad Fort) पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांची ट्रॅव्हल्स बस पाबे घाटातील खोल दरीत कोसळली आहे.या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. दरीत कोसळताच गाडीचा मोठा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले. रेस्क्यू टीमने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दरीत अडकलेल्या इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.