29 C
Gondiā
Tuesday, June 30, 2026
Home शैक्षणिक सटवा येथे औक्षण करीत पहिल्या पावलांचे ठसे घेत केले नवागताचे स्वागत!

सटवा येथे औक्षण करीत पहिल्या पावलांचे ठसे घेत केले नवागताचे स्वागत!

0
8

-बग्गीतून बसवून काढली नवागत विद्यार्थ्यांची फेरी
गोरेगांव – तालुक्यातील सटवा येथे आज ३० जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी भजन किर्तनासह बँड पथकाच्या गजरात वाजतगाजत प्रभातफेरी काढून बग्गीमध्ये बसवून नवागताचे स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यात शाळेची घंटा आज 30 जून रोजी वाजली. वरिष्ठ पातळीवरूनही नवागताचे स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सटवाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच अर्चना रमेश ठाकूर, उपसरपंच विनोद पारधी, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी यांच्या नेतृत्वात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्व नवागताचे स्वागत करून त्यांना बग्गीमध्ये बसवून गाव भ्रमंती करण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्यसह भजन कीर्तनाच्या माध्यमातून शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी व मुख्याध्यापक, शालेय शिक्षक यांनी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष म्हणजे यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे ‘पहिले पाऊल ‘ उपक्रमांतर्गत सर्व नवागत विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भागचंद्र रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, संजय कटरे, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रशेखर कटरे, नत्थुलाल रहांगडाले, कपूरचंद पारधी, गिरधारी कोल्हे, नानाजी रहांगडाले, गोधन बाई कटरे, सहायक शिक्षिका रेणुका जोशी, प्रतिभा चौधरी, सहायक शिक्षक देवेंद्र धपाडे, प्राजक्ता चारमोडे यांच्यासह गावातील इतर नागरिक, पालक मंडळी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.