25.8 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home शैक्षणिक इस्रो अभ्यासदौरा पूर्ण करून परतलेल्या ४१ विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांकडून उत्साहात स्वागत

इस्रो अभ्यासदौरा पूर्ण करून परतलेल्या ४१ विद्यार्थ्यांचे पालकमंत्र्यांकडून उत्साहात स्वागत

0
7

भंडारादि. १४ : भंडारा जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष अभ्यासदौरा यशस्वीरीत्या पूर्ण करून नागपूर येथे परतल्यानंतर त्यांचे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर विमानतळावर उत्साहात स्वागत केले.यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमारशिक्षण उपसंचालक माधुरी सावरकरभंडारा डायटचे प्राचार्य राजेंद्र रुद्रकार तसेच शिवलिंग पडवे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी करून इस्रो भेटीबाबत त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. अभ्यासदौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना नेमके काय पाहायला मिळालेकोणती माहिती मिळाली आणि या भेटीतून त्यांना काय शिकायला मिळालेयाबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने आपले अनुभव पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केले.

या विशेष अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली. अंतराळ संशोधनउपग्रह तंत्रज्ञानअवकाश विज्ञान तसेच भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या विविध पैलूंची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली. इस्रोतील वैज्ञानिक व तांत्रिक कार्यपद्धती जवळून समजून घेतल्याने आमच्या ज्ञानात भर पडली, असे यावेळी विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख झाली असूनभविष्यात या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा शैक्षणिक अभ्यासदौऱ्यांचे महत्त्व मोठे आहे.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या अनुभवाचा उपयोग आपल्या शैक्षणिक वाटचालीत करून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावीअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.